संगमनेर तालुक्यात आणखी एक करोना पॉझिटिव्ह तर चार करोनामुक्त
Coronavirus/ संगमनेर: संगमनेर तालुक्यातील चार जणांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज चार जण करोनामुक्ताची माहिती मिळताच आणखी एका रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८५ वर पोहोचली आहे.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे एक ४५ वर्षीय व्यक्ती करोनाबाधित आढळून आला आहे. त्याची खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे माहिती घेण्याचे काम प्रशासन करीत आहे. त्यामुळे तालुक्याची संख्या ८५ वर पोहोचली आहे.
Website Title: Coronavirus Sangamner one positive four corona free