Home अहमदनगर महिलेस व्हिडियो कॉल करून अश्लील चाळे करून विनयभंग

महिलेस व्हिडियो कॉल करून अश्लील चाळे करून विनयभंग

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यात व्हॉट्‌सअॅप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून, अश्लील मेसेज, व्हाईस मेसेज करून ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यात एका  महिलेस ९ जून रोजी रात्री ११ वाजता तसेच १२ जून रोजी सायंकाळी सात वाजता आरोपीने व्हॉट्‌सअॅप व्हिडियो कॉल करून अश्लील चाळे करत त्या महिलेचा विनयभंग केला. आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचा वापर करीत त्रास देण्यात आला.  

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर करीत आहे.

Website Title: News Harassment of women by video calls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here