Home महाराष्ट्र राज्याला दिलासा: आज चाळीस हजाराच्या खाली रुग्णसंख्या, करोनामुक्तांचे प्रमाण वाढले

राज्याला दिलासा: आज चाळीस हजाराच्या खाली रुग्णसंख्या, करोनामुक्तांचे प्रमाण वाढले

Coronavirus in Maharashtra Update Today 37,236

Coronavirus in Maharashtra: राज्याची चिंता वाढवणारी दुसरी लाट मोठ्या प्रमाणात ओसरल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यापासून चिंतेत असणाऱ्या राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याची रुग्णसंख्या तब्बल दीड महिन्याने चाळीस हजाराच्या आत आली आहे. आज राज्यात ३७ हजार २३६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज तब्बल ६१ हजार ६०७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मृत्यूचा आकडाही काही प्रमाणात खाली आला आहे. आज ५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार रुग्ण उपचार घेत आहे. ही संख्या देखील कमी होऊन सहा लाखांच्या आत आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार:

Maharashtra reports 37,236 new positive COVID-19 cases, 549 deaths and 61,607 recoveries in the last 24 hours

Total active cases: 5,90,818

Total positive cases: 51,38,973

Total death toll: 76,398

Total recoveries: 44,69,425

Web Title: Coronavirus in Maharashtra Update Today 37,236

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here