Home अहमदनगर देशात कोरोनाच्या गंभीर स्थितीला केंद्रसरकारच जबाबदार: मंत्री बाळासाहेब थोरात

देशात कोरोनाच्या गंभीर स्थितीला केंद्रसरकारच जबाबदार: मंत्री बाळासाहेब थोरात

central government is responsible for the serious situation of Corona

अहमदनगर | Corona: देशात आजच्या गंभीर स्थितीला केंद्रसरकारच जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात सर्वाधिक आहे तसेच देशात देखील;भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. याला केंद्रसरकारच जबाबदार आहे. लसीकरणसाठी केंद्राकडून लस उपलब्ध केली जात नाही. लसीकरणासाठी ठोस असे पावले उचलली गेली नाही. यामुळे कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे अशी टीका त्यांनी केंद्रसरकारवर केली आहे.

थोरात म्हणाले कोरोनाची दुसरी लाट घातक आहे. तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु आहे मात्र केंद्रसरकारचे कोणत्याही उपाययोजना व धोरण दिसत नाही.

लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅपमध्ये गोंधळ आहे. राज्यसरकारने अॅपचे नियोजन केले पाहिजे असे ते म्हणाले. तसेच १५ मे नंतर काय करायचे ते कॅबिनेट बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे थोरात यांनी सांगितले.

Web Title: central government is responsible for the serious situation of Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here