Home अहमदनगर रेमडेसिवीर काळाबाजार करणारी टोळीच पोलिसांच्या ताब्यात

रेमडेसिवीर काळाबाजार करणारी टोळीच पोलिसांच्या ताब्यात

Remadesivir black market gang is in the custody of the police

अहमदनगर: जशी अमली पदार्थांची लपून साखळी पद्धतीने विक्री केली जाते त्याच पद्धतीने रेमडेसिवीर (Remadesivir) इंजेक्शन बाबतीत प्रकार समोर आला आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही हा प्रकार सुरु झाला आहे. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना पकडले असता तेथून साखळीच उलगडत गेली. आतापर्यंत चार जण पोलिसांच्या हाती आले आहेत. मुख्य सूत्रधार अजून पसार आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक नियम नियंत्रण केले असताना इंजेक्शन पुरवठा बाहेत येतातच कशी अशा प्रश्नही उपस्थित होतो.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज कारवीई केली आहे.  चार आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सहा इंजेक्शनसह ११ लाख ७० हजारांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, नेवासा तालुक्यात काही व्यक्ती या रेडमेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड आणि आपल्या पथकाला घेऊन सापळा रचला. बनावट ग्राहकामार्फत संशयितांशी संपर्क केला. त्यांनी ग्राहकाला नगर-औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलसमोर येण्यास सांगितले. एका इंजेक्शनची किंमत आरोपींनी ३५ हजार रुपये सांगितले होती. ते घेण्याची तयारी दाखविताच आरोपी समोर आले. रामहरी बाळासाहेब घोडेचोर वय २२ रा. देसवडे, ता. नेवासा व आनंद कुंजाराम धोटे वय २८, रा. भातकुडगांव, ता. शेवगाव यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन हस्तगत करण्यात आली.

चौकशीत त्यांनी ही पंकज खरड रा. देवटाकळी, ता. शेवगाव याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने खरड याचा शोध घेऊन त्याला पकडले. त्याच्याकडेही एक इंजेक्शन आढळून आले.

त्याच्याकडील चौकशीत त्याने हे इंजेक्शन सागर तुकाराम हंडे वय ३०, रा. खरवंडी, ता. नेवासा याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लगेच हंडे याचा शोध सुरू केला. तो वडाळा बहिरोबा गावात बसस्थानकाजवळ आढळून आल्याने त्याला पकडण्यात आले.

त्याच्याकडून दोन इंजेक्शन आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने ती हेमंत राकेश मंडल रा. वडाळा, ता. नेवास याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्याच्याकडे आणखी साठा असून तो ती आपल्या कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवतो अशी माहितीही हंडे याच्याकडून पोलिसांना देण्यात आली. 

त्यामुळे पोलिसांनी हंडे यालाच त्याच्याच मोबाइलवरून मंडल याला फोन करण्यास सांगितले. त्यावर त्याने आपण नेवासा फाटा येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली. त्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. या चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Remadesivir black market gang is in the custody of the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here