Home अहमदनगर Ahmednagar Lockdown News: अहमदनगरमध्ये आणखी वाढला लॉकडाऊनचा कालावधी

Ahmednagar Lockdown News: अहमदनगरमध्ये आणखी वाढला लॉकडाऊनचा कालावधी

Ahmednagar Lockdown News

Ahmednagar Lockdown News: अहमदनगर शहरात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. निर्बंध असतानाही गर्दी कमी होत नाही. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर डोकेदुखी वाढली आहे. शहरातील निर्बंध आणखी पाच दिवस वाढविण्यात आला आहे.

शहरात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्येत अपेक्षित घट होताना दिसून येत नाही. त्यामुळे आणखी पाच दिवस निर्बंध वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत औषध दुकाने, दुध वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.

आज कडक निर्बंधाचा शेवटचा दिवस असल्याने महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये निर्बंधाची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यांनतर आयुक्तांनी तसा आदेश जारी केला आहे. 

Web Title: Ahmednagar Lockdown News Update

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here