या कारणामुळे पत्नीचा आणि एक वर्षाच्या मुलाचा खून करून स्वतः केली आत्महत्या
पुणे | Murder and Suicide: बेरोजगारीला कंटाळून एकान आपल्या पत्नीचा गळा दाबून तर एक वर्षाच्या मुलाचा सुरीने गळा चिरून खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कदमवाकवस्तीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे वय २८, मुलगा शिवतेज वय १ वर्ष असे खून केल्याची नावे आहेत तर हनुमंत शिंदे याने स्वतः घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे सिमेंटच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होते. मात्र दोन महिन्यापासून त्यांचे काम बंद झाले होते. ते कदमवाक वस्तीत कुटुंबांसमवेत राहत होते. हे काम बंद असल्याने कुटुंब चालविणे कठीण झाले होते. हातास काहीकाम धंदा नव्हता. ते गेल्या दोन महिन्यापासून बेरोजगार होता. तो आर्थिक अडचणीत आला होता. अखेर त्याने नैराशेतून रविवारी प्रथम पत्नी प्रज्ञा हिचा गळा दाबून खून केला नंतर मुलाचा सुरीने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वतः ने पंख्याला गळफास घेऊन जीवन संपविले. हा सर्व प्रकार हनुमंत यांचे वडील दुर्याप्पा शिंदे यांनी पहिल्याने पोलिसांना माहिती दिली.
Web Title: Pune No work wife Murder and Suicide