Home अहमदनगर प्रवरानगर येथे आईसोबत १० वर्षाच्या मुलाला करोना, ७ जणांना क्वारंटाइन

प्रवरानगर येथे आईसोबत १० वर्षाच्या मुलाला करोना, ७ जणांना क्वारंटाइन

लोणी: प्रवरानगर लोणी खुर्द येथे मुंबई घाटकोपर येथून आपल्या माहेरी ३५ वर्षीय महिला व तिचा १० वर्षीय मुलगा करोनाबाधित आढळून आला आहे. या महिलेच्या संपर्कातील सात जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

या महिलेचा पती कामानिमिताने घाटकोपर येथे स्थायिक आहे. या महिलेचे सासर अकोले येथील आहे. २४ मे रोजी ती आपला मुलगा व सासूसोबत संगमनेर येथे आली आणि या ठिकाणाहून सासू अकोले येथे आली आणि महिला व मुलगा प्रवरानगर लोणी खुर्द येथे माहेरी गेली होती. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या दोघांची तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवले होते. ३ जून रोजी विलगीकरण कक्षातून घरी गेल्यावर ४ जूनला या महिलेला व मुलाला त्रास जाणवू लागला. या दोघांच्या तपासणी करण्यात आल्या. यात आज या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या दोघांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे.  

Website Title: Coronavirus mother and child corona positive in Pravaranagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here