Home संगमनेर संगमनेर: माहुली घाटात कार दरीत कोसळली

संगमनेर: माहुली घाटात कार दरीत कोसळली

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर माहुली घाट येथे मारुती कार सुमारे दीडशे फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन जखमी झाले आहेत. रविवारी दिनांक ७ जून रोजी ही दुपारी घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर येथून दोघे जण मारुती कारमधून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने घारगावच्या दिशेने जात होती. रविवारी दुपारी माहुली शिवारात कार आली असता त्याचदरम्यान कार संरक्षण कठडे तोडून १०० ते १५० फुट खोल दरीत कोसळली. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यात दोघे जण जखमी झाले आहेत. कारमधून दोघांना बाहेर काढून खासगी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी आळेफाटा येथे नेण्यात आले. दैव बलत्तर या दोघांचे प्राण वाचले. या दोघांवर आळे फाटा येथे उपचार सुरु आहेत.

Website Title: Latest News Sangamner Mahuli Ghaat car collapse Accident two injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here