Home अहमदनगर संगमनेरमध्ये आणखी एका करोना बाधित महिलेची भर

संगमनेरमध्ये आणखी एका करोना बाधित महिलेची भर

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात शेडगाव येथे मागील काही दिवसांपूर्वी मुबई येथून आलेली ६३ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली होती. आता तिच्या संपर्कातील घरातील ४० वर्षीय महिलेला करोनाची बाधा  झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज दोन करोना बाधित आढळून आले त्यात शेडगाव येथील एका ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या ६२ झाली आहे.

त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती एकत्रित करण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे. 

तसेच वाशी मुंबईहून शेवगाव येथे आलेल्या २२ वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संख्या दोनने वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यात तसेच संगमनेर तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढतच आहे त्याचबरोबर आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्तांची संख्या १३६ झाली आहे.

 

Website Title: Coronavirus Sangamner another one ladies positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here