Home अहमदनगर अहमदनगर जिल्हात आणखी पाच करोना बाधित तर १२ जण करोनामुक्त

अहमदनगर जिल्हात आणखी पाच करोना बाधित तर १२ जण करोनामुक्त

अहमदनगर: रविवार दिनांक ७ जून रोजी पाच करोनाग्रस्त आढळून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात करोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असतानाच दिसून येत आहे मात्र दुसरीकडे करोनामुक्त झालेल्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आज बारा जणांना घरी सोडण्यात आले आहे. १२१ जण जिल्ह्यात करोनामुक्त झाले आहेत.

नगर शहरातील पाच, राशीन ता. कर्जत येथील दोन, संगमनेर येथील २, राहता,अकोले आणि नेवासा प्रत्येकी एक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या ८० रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आज २९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २१२ झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला आधीच्या व्यक्तीच्या संपर्कातून करोनाची लागण झाली आहे. राहता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिला करोना बाधित आढळून आली आहे. प्रवरानगर येथील ३४ वर्षीय महिला आणि ११ वर्षाचा मुलगा करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जिल्ह्यात सध्या ८० रुग्ण उपचार घेत आहेत तर १२१ जनांना घरी सोडण्यात आले आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar 12 corona free and five new corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here