Home अहमदनगर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या २.० सरकारचे प्रथम वर्ष यशस्वीपणे पूर्ण, व्हर्चुअल सभेचे...

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या २.० सरकारचे प्रथम वर्ष यशस्वीपणे पूर्ण, व्हर्चुअल सभेचे आयोजन

शिर्डी:  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 2 ला एक वर्ष पूर्ण झालेबद्दल व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले असून भारताचे संरक्षण मंत्री ना. राजनाथसिंह ८ जून रोजी ५ वाजता मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली

भारतीय जनता पार्टीचे नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या २.० सरकारचे प्रथम वर्ष यशस्वीपणे पूर्ण झाले आहे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सभा अन सभांना होणारी गर्दी टाळण्यासाठी व्हर्चुअल सभा प्राधान्य देऊन नवीन तंत्रज्ञान वापरून डिजिटल सभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात येणार आहे.याची सुरुवात उत्तर महाराष्ट्र पासून होणार आहे.

चीन सारख्या शत्रूला गारद करणारे भारताचे संरक्षणमंत्री मा. राजनाथ सिंगजी हे संबोधीत करणार आहेत. या व्हर्चुअल  सभेस प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, सुभाष भामरे, गिरीष महाजन, जयकुमारजी रावल आदी मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहेत. तर व्हेबेक्स च्या माध्यमातून माजी मंत्री मधुकरराव पिचड, राधाकृष्ण विखे पाटील, प्रा. राम शिंदे बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभवराव पिचड, बाळासाहेब मुरकुटे जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे आदी उपस्थित राहतील.

व्हर्चुअल सभेची रूपरेषा पुढिलप्रमाणे दु. ४:३०वा सभेला ॲानलाईन उपस्थिती दर्शवावी सायंकाळी ५.०० वा मंच संचालन जयकुमारजी रावल, सायंकाळी ५.०५ प्रास्ताविक चंद्रकांतदादा पाटील, सायंकाळी ५.१५ प्रमुख वक्ता श्री. राजनाथ सिंगजी हे मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती डिजिटल अभियान चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले

सदर सभा ही नवीन संकल्पने प्रमाणे पूर्णपणे व्हर्चुअल होणार आहे. सभेला आपण युटयुब, फेसबूक, आदी संकेतस्थळांद्वारे हजेरी लावून भारतीय जनता पार्टीच्या व्हर्चुअल सभेत सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, नितीन दिनकर,सुनील वाणी, डॉ अशोक इथापे, साहेबराव रोहम, राजेंद्र सांगळे, नंदकुमार जेजुरकर,  किरण लुनिया, कैलास खैरे सर्व पदाधिकारी व नागरीकांना यांनी केले आहे.

Website Title: News Rajanath Singh virtual discussion 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here