Home संगमनेर संगमनेर: नाईकवाडपुरा भागातील महिलेचा करोनाने मृत्यू

संगमनेर: नाईकवाडपुरा भागातील महिलेचा करोनाने मृत्यू

संगमनेर: संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा भागातील एका ५० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. संगमनेरमध्ये करोनाने ११ जणांचे बळी घेतले आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय महिला व नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला करोना बाधित आढळून आली होती. यातील ५० वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून कुत्रिम प्राणवायूवर ठेवण्यात आले होते मात्र काल तिची प्रकृती ढासळली आणि अखेर त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे.

Web Title: Coronavirus Naikvadpura sangamner ladies Death

Get the latest  Sangamner News, Akole News, Ahmednagar News, Maharashtra News from Crime, Political, Accident, Entertainment, Social News from all Cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here