Home अहमदनगर वडगाव पान येथील खून प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

वडगाव पान येथील खून प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

संगमनेर: राहुल देविदास काळे हा वडगाव पान खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याने सोमवारी दिनांक २२ जून रोजी बाळासाहेब माधव चत्तर व त्यांचा मुलगा प्रतिक चत्तर यांच्यावर जुन्या वादातून चाकूने हल्ला केला होता. बाळासाहेब चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

त्यानंतर मुख्य आरोपी व त्याचे मित्र पसार झाले होते. आरोपी राहुल काळे यास दिनांक २५ जून रोजी अहमदनगर येथून अटक करण्यात आली. मदत करणारे मित्र शुभम दिलीप परदेशी, महेश सुपेकर या दोघांना संगमनेर येथून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी राहुल काळे, देविदास काळे, रामा गायकवाड या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील रामा गायकवाड अजूनही फरार आहे.  या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत यांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान फाटा येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता या सर्वाना रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. अशी माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.

Web Title: Murder news Three arrested in Wadgaon Pan murder

Get the latest  Sangamner News, Akole News, Ahmednagar News, Maharashtra News from Crime, Political, Accident, Entertainment, Social News from all Cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here