Home अकोले अकोले: तांबोळ येथे मोटारसायकल अपघातात तरुण ठार

अकोले: तांबोळ येथे मोटारसायकल अपघातात तरुण ठार

अकोले: अकोले तालुक्यातील तांबोळ शिवारात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २७ जून रोजी सकाळी हा अपघात घडला.

या अपघातात राजू भाऊराव उघडे वय २१ रा. पांजरे हा तरुण ठार झाला आहे. शुक्रवारी राजू उघडे हे मोटारसायकलवरून वीरगाव येथे जात होते. तांबोळ गावाच्या शिवारात मोटारसायकल रस्त्याच्या कडेला घसरून गंभीर जखमी झाला. मात्र त्याला रुगणालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला आहे. एकनाथ भरत मेंगाळ रा. वीरगाव ता. अकोले यांनी अकोले पोलीस ठाण्यात खबर दिल्याने या अपघातात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Young man killed in a motorcycle accident at Tambol

Get the latest  Sangamner News, Akole News, Ahmednagar News, Maharashtra News from Crime, Political, Accident, Entertainment, Social News from all Cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here