Home अकोले अकोलेतील ब्राम्हणवाडा येथील दोन, संगमनेर कुरण येथे एक करोनाबाधित, अकोलेतील एकाचा मृत्यू

अकोलेतील ब्राम्हणवाडा येथील दोन, संगमनेर कुरण येथे एक करोनाबाधित, अकोलेतील एकाचा मृत्यू

Coronavirus/संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात आज दहा करोनाबाधित आढळून आले आहेत. यात अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील दोन तर संगमनेर तालुक्यात कुरण येथे पुन्हा एक करोना बाधित आढळून आला आहे.

अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील २६ वर्षीय तरुण तर १७ वर्षीय तरुणी करोनाबाधित आढळून आली आहे. हे दोनही रुग्ण मुंबई येथून प्रवास करून आलेले होते.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे मागील व्यक्तीच्या संपर्कातून ३५ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.

अकोले तालुक्यातील रविवारी आढळून आलेला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ३६ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या व्यक्तीचा करोनाशी लढा देत असताना काल मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Coronavirus Sangamner akole corona update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here