Home अकोले सिंघम स्टाईलने नितीन पाटील यांनी राजूर येथे राहत्या घरातून मोठा अवैध दारू...

सिंघम स्टाईलने नितीन पाटील यांनी राजूर येथे राहत्या घरातून मोठा अवैध दारू साठा केला जप्त  

राजूर प्रतिनिधी: राजूर पोलिसांनी गेल्या हप्त्याभरामध्ये  हॉटेल पंचशील सह राजूर येथील एका नामांकित अवैध दारू व्यावसाईकावर राहत्या घरामध्ये गुप्त बातमीदारामार्फत धाड टाकन्यात आली आहे.तर यावेळी बेडरूम मधील कपाटाच्या खास दारू लपविण्यासाठी बनवलेल्या फर्निचरच्या कप्प्यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी रमेश वाडेकर यांच्या लक्षात आल्याने अवैध दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यात सरकारी फिर्यादी मनोहर मोरे यांच्या फिर्यदिवरून आरोपींविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १३५ पोलीस नाईक विजय मुंढे करीत आहेत.

सविस्तर माहिती अशी की 29 जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास  राजूर पोलीस स्टेशनचे स.प.नि. नितीन पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी सुरेश रामभाऊ कानकाटे यांच्या राहत्या घरी जाऊन देशी-विदेशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून राजूर पोलिसांनी सिने स्टाईल ने धाड टाकून तब्बल तीन तास घराची तपासणी करून दाराच्या पहिल्या पायरी पासून ते शेवटच्या काना कोपऱ्या पर्यंत शोधून हा अवैध दारूसाठा जप्त करण्यात नितीन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना मोठे यश आले आहे. घरात लाकडी कपाटाच्या पायथ्याच्या कप्प्यात मिळालेला प्रो व्ही गुन्ह्याचा माल 8550 रुपये किमतीचा मेकडॉल नंबर वन कंपनीच्या विदेशी दारू 57 सीलबंद कॉटर प्रत्येक 180 मुलीच्या प्रत्येकी 150 रुपये दराने    2496 रुपये किमतीचा माल बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या 48 सीलबंद कॉटर प्रत्येक 180 मी ली च्या प्रत्येकी 52 रुपये दराने हा सर्व माल घरामध्ये पकडण्यात आलं असून ते बाकीचा काही माल घराजवळ च असलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची असलेली वॅग्नर गाडी एम एच.17. ए. झेड.3620  या गाडीमध्ये 7200 रुपये किमती  मेक डॉल नंबर वन कंपनी चे विदेशी दारूची कॉटर प्रत्येकी 180ml प्रति किमी 150 रुपये दराने खाकी रंगाच्या खोक्यात मिळाला व 2496 रुपये कि मी चा माल बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या 48 सीलबंद कॉटर  प्रत्येकी 180 मि ली च्या प्रत्येकी 52 रुपये एका बॉक्स मध्ये मिळून आले. एकूण मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची वॅगनर कार व बाकीच्या मुद्देमाल धरून चार लाख वीस हजार 744 रुपये प्रमाणे प्रो व्हीं गुन्ह्याचा मुद्देमाल विनापरवाना माल जप्त करण्यात आला.

गुप्त बातमी धारा मार्फत सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ. कैलास नेहे, विजय मुंडे, देविदास भडकवाड,पांडुरंग पटेकर,मनोहर मोरे, म.कॉ.रोहिणी वाडेकर तर पोलीस कॉन्स्टेबल 2512 मनोहर मोरे राजुर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश रामभाऊ कानकाटे, मुलगा सचिन सुरेश कानकाटे,मयुर सुरेश कानकाटे यांच्याविरुद्ध प्रो.व्हि.ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विजय मुंडे हे करीत आहे.

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील राजूर मधील अवैध दारू विक्रेत्यांसाठी सिंघम ठरत आहे.

Website Title: Latest News Rajur police Nitin Patil action

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here