Home क्राईम लहान वयातच लग्न लावून देत असल्यामुळे आई वडिलांवर गुन्हा दाखल

लहान वयातच लग्न लावून देत असल्यामुळे आई वडिलांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर: एका अल्पवयीन असलेल्या सावत्र मुलीचा लग्न लावण्यासाठी छळ करण्यात आला असून पोलिसांनी दखल घेत माता पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.

टाकळीभान तालुका श्रीरामपूर येथील १३ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी घरातून निघून मामाकडे बाजाठाण ता. वैजापूर येथे गेली होती. मुलगी हरवली असल्याची तक्रार देण्यासाठी तिचे वडील तालुका पोलीस ठाण्यात गेले होते.

पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी हे प्रकरण तपासासाठी पोलीस नाईक आबासाहेब गोरे यांच्याकडे सोपविले होते. त्यांना मुलगी बाजाठान येथे असल्याची माहिती देण्यात आली.

तिच्या आई वडिलांनी आईला टाकून दिले असून ती माहेरी औरंगाबाद येथे राहते. लहान वयात लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे तिचा छळ करण्यात येत होता.

याप्रकरणी सावत्र आई छाया शाम गांगुर्डे, वडील शाम मारुती गांगुर्डे रा. टाकळीभान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Website Title: News Crime registered against the parents for marrying at an early age

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here