Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा पाचशे

अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा पाचशे

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी ३५ करोना बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ५०० झाली आहे.

बुधवारी सकाळी १० तर दुपारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये नगर शहरात तब्बल २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अकोलेतील ब्राम्हणवाडा येथील २, संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ०१, कोपरगाव ०१, राहुरी येथे ४ श्रीरामपूर येथे १,पाथर्डी १, राहता १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अन्य बीड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.

नगर शहरातील तोफखाना येथे १०, ढवणवस्ती २, केडगाव १ आणि भूषणनगरमध्ये १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सिद्धार्थनगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला आढळून आली आहे. पाईपलाईन रोड वर पदामानगर मध्ये ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष आणि ३० वर्ष तरुणाचा समावेश आहे. पदामानगर मध्ये येथील सर्व रुग्ण मागील व्यक्तींच्या संपर्कातील आहेत.  पद्मानगर परिसर लॉक करण्यात आला आहे.  

राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ३ वांबोरी येथे १ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. शिरूरकासार जिल्हा बीड येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. पाथर्डी मधील वामनभाऊ नगर येथे १, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील १ आणि ओम नगर येथील ०२ शिर्डी ता. राहता येथील ०, श्रीरामपूर येथील खेरी निमगाव येथे ०१ करोना बाधित आढळून आला आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar corona patient 500 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here