Home महाराष्ट्र राज्यात करोनामुळे पोलीस दलातील ६० जणांचा बळी

राज्यात करोनामुळे पोलीस दलातील ६० जणांचा बळी

मुंबई: करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलालाही करोणाचा साथीचा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावत असताना त्यांना करोनाची लागण झाली आहे.

करोनाची लागण झाल्यामुळे मृत्यूमुखी पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ६० वर पोहोचली आहे. यामधील ३८ पोलीस हे मुंबई पोलीस दलातील आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

आतापर्यंत ४ हजार ९०० पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामधील २६०० पोलीस हे मुंबई पोलीस दलातील आहे. या आजारातून बरे झालेल्या पोलिसांची संख्या ३ हजार ७०० एवढी आहे. तर सध्या १ हजार १५ एवढी पोलीस कर्मचारी अद्याप उपचार घेत आहेत.

Website Title: Maharashtra News Corona kills 60 police in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here