Home महाराष्ट्र खळबळजनक: गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडून जवानाने केली आत्महत्या

खळबळजनक: गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडून जवानाने केली आत्महत्या

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे जवानाने गर्भवती पत्त्नीवर गोळ्या झाडून स्वतः वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. अजय कुमार सिंह वय २५ आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. प्रियांका कुमारी असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारातील ही खळबळजनक घटना घडली आहे.

अजय कुमार आणि प्रियांका कुमारी हे दोघेही मुळचे बिहारचे आहेत. या दोघांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. अजय कुमार हा पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारमध्ये कार्यरत होता. त्याची पत्नी प्रियांका ही गर्भवती होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास  अजय कुमार कामावरून  अचानक घरी आला. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घरी आला होता. त्याने रायफलमधून पत्नीवर गोळ्या झाडल्या आणि स्वतःही गोळ्या झाडून घेतल्या.

यामध्ये  तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या. जखमी अवस्थेत त्याला सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने हे कृत्य कोणत्या कारणामुळे केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.  या घटनेने पुलगाव येथे  खळबळ उडाली  आहे.  पोलीस अधिक तपास करीत आहे.

Website Title: Vardha Soldier commits suicide by shooting his pregnant wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here