अहमदनगर जिल्ह्यात १० करोना रुग्ण, संगमनेरमधील पेमरेवाडी येथे एक रुग्ण
Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज दहा रुग्ण आढळून आले आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालात १० पॉझिटिव्ह आढळले आहे.
यात नगर शहरातील ०२, श्रीरामपूर येथील १, पेमरेवाडी ता, संगमनेर येथील १, दाढ बुद्रुक ता. राहाता येथील ०१, भिंगार येथील ०१ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण संपर्कातून बाधित झालेले आहेत.
यामुळे अहमदनगर जिल्ह्याची एकूण करोना बाधितांची संख्या ५१० झाली आहे. तर सध्या जिल्ह्यात १६२ रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आज २१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये नगर मनपा ०९, संगमनेर ७, श्रीरामपूर २, राहता पारनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यत डिस्चार्ज दिलेल्याची संख्या ३३३ झाली आहे.
Web Title: Coronavirus Ahmednagar Sangamner report update