Home अकोले अकोले खळबळजनक घटना: खून करून मृतदेहाचे तुकडे करून गोणी भरून नदीत फेकले

अकोले खळबळजनक घटना: खून करून मृतदेहाचे तुकडे करून गोणी भरून नदीत फेकले

अकोले: अकोले तालुक्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात तरुणाचा खून करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून नदी[पात्रात फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील वाकी शिवारात कोणीतरी अज्ञात तरुणाचा खून करण्यात आला त्याचबरोबर त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. ते तुकडे गोणीत भरून कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले.

कृष्णावंती नदीच्या पात्राच्या ठिकाणी दुर्गंध येत असल्याने वाकीचे पोलीस पाटील सोमनाथ भोर यांनी घटनेची माहिती राजूर पोलिसांना कळविली. ही माहिती राजूर पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी कोणाचा खून करण्यात आला कोणी आणि कशासाठी केला याबाबत माहिती अजून प्राप्त झालेली नाही. पोलिस यंत्रणेकडून याबाबत तपास करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

Website Title: Latest News Akole killed cut his body into pieces, threw a sack into the river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here