संगमनेरमध्ये आज एकाच दिवशी तब्बल सात करोना रुग्ण तर कोतूळ येथे एक
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात तब्बल सात करोनाबाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात एक रुग्ण करोनाबाधित आढळून आला आहे.
अकोले तालुक्यात कोतूळ येथील एका ४८ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी रोड येथील ४४ वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झालेली आहे.
संगमनेर शहरातील राजवाडा भागातील ३८ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.
दिल्ली नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि ३६ वर्षीय पुरुष, भारत नगर येथील ७० वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्येने शतक पार केले आहे. त्यामुळे संगमनेरकराची चिंता वाढलेली आहे. संगमनेरमध्ये दररोज करोना बाधित आढळून येत आहे. प्रशासन आता या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेत आहे.
अकोले तालुक्यात समशेरपूर नंतर आज कोतूळ येथे आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Website Title: Coronavirus Sangamner Akole news Updates