Home अहमदनगर बारावीच्या विद्यार्थिनीचा विहिरीत आढळला मृतदेह

बारावीच्या विद्यार्थिनीचा विहिरीत आढळला मृतदेह

जामखेड: जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

ही घटना खुनाचा प्रकार आहे की याबाबत जामखेड पोलीस वेगाने तपास करीत आहे. एका संशियीताला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील डोणगाव येथील विद्यार्थिनी मुक्ता संभाजी वारे ही गुरुवारी बेपता झाली होती. तशी तक्रार मुलीचे आजोबांनी पोलिसांत दाखल केली होती. शनिवारी मात्र मृतदेह डोणगाव शिवारातील अशोक यादव या शेतकर्याच्या शेतातील विहिरीत आढळून आली. तिने यावर्षी बारावीचे पेपर दिले होते. मयत मुक्ता ही आजोबांकडे लहानपणापासून आजोळी राहत होती. तिचे मुळगाव तालुक्यातील रत्नापूर आहे.

पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जामखेडच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने पोलीस करीत आहे. या प्रकरणातील संशियीत तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे.

Website Title: News 12th standard student was found in a well Jamkhed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here