Home अकोले अकोले तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोले: अकोले तालुक्यातील खानापूर येथील एका तरुणाने शेतात्त लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवार दिनांक १८ जून सायंकाळी साडे सात वाजता घडली आहे.

संदीप  द्वारकानाथ खोडके या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, संदीप यांचे वडील द्वारकानाथ रामचंद्र खोडके यांनी फिर्याद दिली असून म्हंटले आहे की, मुलगा संदीप द्वारकानाथ खोडके हा गुरुवार दिनांक १८ जून रोजी सायंकाळी साडे सात वाजता नाशिक येथून आला व लगेच शौचास जातो असे कारण सांगून शेतात गेला. तेथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्यामागील नेमके कारण मात्र समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस नाईक संदीप पांडे हे करीत आहे.

Website Title: Latest News Akole youth commits suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here