Home संगमनेर संगमनेरात नाईकवाडपुरा, घुलेवाडी, जोर्वेत आढळले करोनाबाधित

संगमनेरात नाईकवाडपुरा, घुलेवाडी, जोर्वेत आढळले करोनाबाधित

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज तीन नवे रुग्ण आढळून आले आहे. संगमनेरात नाईकवाडपुरा, घुलेवाडी, जोर्वेत करोनाबाधित आढळून आले आहेत.

संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा येथील ५९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. घुलेवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जोर्वे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. संगमनेरमधील वाढती करोनाबाधित संख्या शतकाकडे वाटचाल सुरु आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण सहा रुग्ण आढळून आले आहे. त्यातील संगमनेरमधील तिघांचा समावेश आहे. तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकजण करोना बाधित आढळून आला आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण झाली आहे.  यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे ही लागण झाली आहे.  मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून आला होता. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २८२ वर पोहोचली आहे.

Website Title: Coronavirus Sangamner corona patient updates

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here