Home संगमनेर संगमनेरात चीन राष्ट्राध्यक्ष प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून फाशी

संगमनेरात चीन राष्ट्राध्यक्ष प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून फाशी

संगमनेर: संगमनेरमधील माहिती प्रवाह ट्रस्टच्या वतीने चीनचे राष्ट्राध्यक्ष प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला आणि नंतर बस्थानक चौकात फाशी देण्यात आली.

भारत आणि चीनच्या सीमेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले.  त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  

चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात यावा व चीनला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच चीनच्या वस्तू खरेदी करू नये यासाठी जनजागृती करणार असल्याचे ट्रस्टचे समन्वयक मणियार यांनी सांगितले.

माहिती प्रवाह ट्रस्टचे समन्वयक मोहसीन मणियार व त्यांचे सहकारी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घातला आणि त्यानंतर शहरात फेरी काढून बस्थानक चौकात पुतळ्याला फाशी देण्यात आली.

Website Title: Latest News statue of the Chinese president is hanged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here