Home अकोले राजूर येथील संजय शुक्ला गॅंगला हद्दपारीची कारवाई, अवैध धंद्यांना चपराक

राजूर येथील संजय शुक्ला गॅंगला हद्दपारीची कारवाई, अवैध धंद्यांना चपराक

अकोले: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व दारूबंदीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजूर गावात परप्रांतीय मजूर म्हणून आलेले व मजुरी करण्यापेक्षा दारूबंदी असताना अवैध्य रित्या दारू , गांजा व्यवसाय करून गावाला तसेच सामाजिक कार्यकर्ते याना वेठीस धरून प्रसंगी पोलिसांवरही हात उचलणाऱ्या संजय शुक्ला गॅंगला राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी नितीन पाटील यांनी तालुक्यात संघटितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या संजय अदालतनाथ  शुक्ला, (३०) राहुल अदालतनाथ शुक्ला (२५)विनय अदालतनाथ शुक्ला (२३)मूळचे उत्तरप्रदेश सर्व राजूर यांचेवर हद्दपारीची कारवाई व्हावी म्हणून जिल्हा पोलिसांकडे प्रस्ताव पाठविला होता त्याचा सर्व तपासणी अहवाल घेऊन या तिघांच्या टोळीला २ वर्षासाठी नगर जिल्ह्यासह बाजूच्या तीन जिल्ह्यासह हद्दपार करण्यात आल्याची माहिती स.पो.नि. नितीन पाटील यांनी दिली आहे .त्यामुळे राजूर परिसरात समाधान व्यक्त होत आहे . दारू बंदीचे कार्यकर्ते हेरम्ब कुलकर्णी यांनी हा निर्णय म्हणजे ऐत्यासिक असून इतर अवैद्य विक्रेत्यांना त्यामुळे चपराक बसली असल्याचे ते म्हणाले .

राजूर येथे गेली ४० वर्षांपूर्वी  अदालतनाथ शुक्ला आपल्या पत्नीसह उत्तरप्रदेश मधून आला . प्रथम पेढे विक्री नंतर होळीचे कडे गाठी विक्री करून गुजराण करीत असे मात्र त्याने मुले मोठी झाल्यावर प्रथम गांजा , नंतर दारू विक्री सुरु केली त्याचा मोठा मुलगा संजय याने राजूर परिसरात राजरोस अवैध्य व्यवसाय सुरु केले . पोलिसांना हाताशी धरून चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांना आवाज केला तर केसेस करील अशी दमबाजी देऊन आपल्या गँगची दहशत निर्माण केली होती . त्याच्या नदी सहसा कुणी जात नसल्याने त्याने मोठ्या प्रमाणात दारू विक्री करून पैसे मिळविले त्यासाठी पोलीस खात्याचेही सहकार्य मिळाल्याने त्याने नंतर दारू उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनाही छापा टाकायला आल्यावर महिलांना पुढे करून मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याचे पोलीस रेकॉर्ड आहे . राजूर येथे दारू बंदी असतानाही तो सार्वजनिक ठिकाणी दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता तर काही पोलीस कर्मचारीही त्याच्या या कामात सहभागी असल्याचे समोर आले आहे . त्यातली काहींची बदली झाली तर अजूनही छुपे रुस्तुम तिथेच आहे . दिनांक १८/०३/२०१९ रोजी पोलीस निरीक्षक, राजुर पोलीस स्टेशन यांनी राजुर तसेच अकोले तालुक्यातील संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुद्द हद्दपारीचा कारवाई व्हावी याकरीता प्रस्तावातील इसम नामे टोळीप्रमुख

१) संजय अदालतनाथ शुक्ला बय ३० रा.राजुर ता. राजुर जिल्हा अहमदनगर, टोळीसदस्य अ.नं

२) राहुल अदालतनाथ शुक्ला वय २५ वर्ष रा.राजुर ता. राजुर जिल्हा अहमदनगर, टोळीसदस्य अनं ३) विनय

अदालतनाथ शुक्ला वय २३ वर्ष रा. राजुर ता राजुर जिल्हा अहमदनगर यांचे विरुद्ध २ वर्षाकरीता हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आले होते. सदर प्रस्तावावर मा, अखिलेश कुमार सह, हृद्दपार प्राधिकरण तथा, पोलीस अधिक्षक सौ. अहमदनगरयांनी सदर हद्दपार टोळीविरुष्द राजुर गाव तसेच अकोले परिसरात संघटीतप्ण मारामारी करुन दुखापत करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून दहशत निर्माण करणे, सरकारी नोकरीस मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणणे, जातीवाचक शिवीगाळ  करुन दमबाजी करणे, अवैधरित्या संगनमताने दारु कब्जा बाळगुन बिक्री करणे चोरी करणे. शिवीगाळ करणे सार्वजनिक ठिकाणी  गैरवर्तणूक  करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे. सदर संघटीतपणे गुन्हे कारणारी टोळीतील इसमें नाम टोळीप्रमुख

१) संजय अदालतनाथ शुक्ला  वय ३० रा.राजुर ता.अकोले गुन्हे , टोळीसदस्य 

२) राहुल अदलतनाथ शुक्ला वय २५ वर्ष रा.राजुर ९ गुन्हे

 ३) विनय अदालनाथ शक्ला यव २३ वर्ष रा राजूर४ गुन्हे  यांना अहमदनगर,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिनांक १८/०६/२०२० रोजी हद्पारीचा अंतिम कारवाई करून हद्द पारीचा आदेश परित केला आहे. (संजय शुक्ल यास दिड  वर्षे नगर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर , इगतपुरी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून ,विनायक शुक्ला यास दिड तर राहुल शुक्ला यास २ वर्षे तीन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

Website Title: Latest News Rajur Sanjay Shukla gang deported

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here