Home अहमदनगर पत्नीसह प्रियकराला पतीने दिला चोप, गुन्हा दाखल  

पत्नीसह प्रियकराला पतीने दिला चोप, गुन्हा दाखल  

श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरातील एका खासगी रुग्णालयात रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पत्नीबरोबरच तिच्या प्रियकराला पतीने चोप दिल्याची घटना घडली आहे.

श्रीगोंदा कारखान्यावरील विवाहित महिला शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होती. तिचे अरुण सानप या युवकाशी प्रेमसंबंध जुळले त्यांचे प्रेम फुलू लागले. या महिलेच्या पतीने अनेक वेळा समज दिली होती.पत्नीला सुनावून सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. त्रासलेल्या पतीने शेवटी मात्र श्रीगोंदा येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन हाणामारी केली. त्या दोघांना चांगलाच चोप दिला.

अरुण सानप असे या प्रियकराचे नाव आहे. पतीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यात तो जखमी झाला. याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रेयसीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Website Title: News Husband beats boyfriend with wife Shrigonda Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here