Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

संगमनेर: सलमान जाकीर पठाण वय १७ या तरुणाचा संगमनेर तालुक्यातील करुले शिवारात शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

या घटनेप्रकरणी इतिशान दादाबाई पठाण यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करुले येथील सलमान जाकीर पठाण हा शनिवारी दुपारपासून घरातून बेपत्ता होता. तो रात्री घरी परतला नाही. दरम्यान रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मच्छिंद्र शिवराम कोल्हे यांच्या मालकीच्या शेतातील शेततळ्यात या तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मृतदेह शेततळ्यातून बार काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी प्रथम घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात व तेथून संगमनेर काटेज रुग्णालयात हलविला.

हा युवक शेततळ्याकडे कशासाठी गेला होता, याचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे.

Website Title: Latest News Youth drowns in farm in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here