Home अहमदनगर धक्कादायक: संगमनेर तालुक्यात्त आज एकाच दिवशी सात रुग्ण

धक्कादायक: संगमनेर तालुक्यात्त आज एकाच दिवशी सात रुग्ण

संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यातील करोना तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यात संगमनेर मधील पाच व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

निमोण या गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

तर संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

तसेच शहरातील लखमीपुरा येथील दोन जणांचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये एकूण करोना बाधितांची संख्या ८० वर पोहोचली आहे. करोनाची समस्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान आज जिल्ह्यातील १९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संगमनेर शहरात प्रशासन सतर्क असून या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka Seven Corona Patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here