Home संगमनेर संगमनेर: साकुर येथे डंपरच्या धडकेने एकाला दोनही पाय गमवावे लागले

संगमनेर: साकुर येथे डंपरच्या धडकेने एकाला दोनही पाय गमवावे लागले

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर चौफुली येथे काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास डंपरने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघही गंभीर जखमी झाले आहेत. एकाला तर आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डंपरवरील चालक हा मांडवे गावाकडे जात असताना दुचाकीवरून शेंडेवाडी येथील सुखदेव दत्तू काळे व नवनाथ चंद्रराम काळे हे दोघे समोरून आल्याने डंपरने जोराची धडक दिली. एकाला दोनही पाय गमवावे लागले.

अपघात झाल्याची माहिती समजताच घारगाव पोलिसांनी जखमींना संगमनेर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Website Title: News lose both legs due to Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here