Home अहमदनगर मारहाण करून सॅनिटायझर असलेला ट्रक पळविला, ३२ लाखाचा मुद्देमाल लुटला   

मारहाण करून सॅनिटायझर असलेला ट्रक पळविला, ३२ लाखाचा मुद्देमाल लुटला   

कर्जत(News): नगर सोलापूर महामार्गाहून सॅनिटायझर घेऊन चाललेला ट्रक पाटेवाडी शिवारात चार जणानी अडवून चालक वाहक यांना मारहाण करून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. 

गुजरात राज्यातून अंकलेश्वर येथून ट्रकमध्ये (क्रमांक २८ बी.ए.१६९४) सॅनिटायझर भरून तो ट्रक नगर सोलापूरमार्गे केरळ राज्यातील त्रिवेंद्रम येथे चालला होता. ट्रकमध्ये चालक आणि वाहक हे दोनच जण होते. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पाटेवाडी ता. कर्जत येथे आला असता गतिरोधक असल्याने ट्रकचा वेग कमी करण्यात आला याचवेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार जणांनी ट्रक अडवत चालक व वाहक यांना बेदम मारहाण केली. त्या दोघांना धमकी देऊन सोलापूर मार्गे पसार झाले. यात ट्रकमधील २१ लाख ९० हजार रुपयांचा सॅनिटायझर बॉटल व १० लाख रुपयांचा ट्रक असे एकूण ३२ लाख रुपयांची चोरी केली आहे. याप्रकरणी ट्रक चालक मणीवेल पेरूमल यांनी फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Website Title: News truck with the sanitizer was hijacked

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here