Home अहमदनगर नगरमध्ये तीन करोना रुग्ण तर राहता तीन एकूण सहा आढळले

नगरमध्ये तीन करोना रुग्ण तर राहता तीन एकूण सहा आढळले

Coronavirus /अहमदनगर: आज नगर शहरात तीन रुग्ण तर एकट्या राहता तालुक्यात तीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आज सहा रुग्ण वाढले आहे. एकूण संख्या २३८ वर पोहोचली आहे. नगर शहरातील शाहूनगर केडगाव येथील ३४ वर्षीय महिला बाधित व्यक्तीच्या संपर्कातून बाधित झाली आहे. रेल्वे स्टेशन येथील २८ वर्षीय महिला आजाराची लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल झाली होती.  गजानन कॉलनी एमआयडीसी येथील ४८ वर्षीय पुरुष सारीची लक्षणे आढळल्याने रुग्णालयात दाखल झाला होता यांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राहता येथील तीन रुग्ण आढळून आले आहेत. यात ४० वर्षीय, ३२ वर्षीय आणि ५६ वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत. राहता येथील बाधित हे सर्ब मागील व्यक्तींच्या संपर्कातून बाधित झाले आहेत अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.  

Website Title: Coronavirus Ahmednagar Rahata six patient corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here