Home अहमदनगर सख्या बहिणींचा अपघात, एक ठार एक जखमी

सख्या बहिणींचा अपघात, एक ठार एक जखमी

अहमदनगर(Latest News): नगर पुणे महामर्गावर केडगाव हॉटेल अंबिका समोर स्कूटरला अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटरवरील एक महिला जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. या दोघीही सख्या बहिणी होत्या.

मनीषा बाळासाहेब कापरे व रेखा प्रशांत चव्हाण या दोघी बहिणी स्कूटरवरून केडगावहून भूषणनगरकडे जात असताना त्यांच्या गाडीला एका अवजड वाहनाची जोराची धडक बसल्याने अपघात घडला. या अपघातात मनीषा बाळासाहेब कापरे मृत झाल्या आहेत तर रेखा प्रशांत चव्हाण गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात झाल्यानंतर वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. राष्ट्रवादीचे नेते अंबादास गारुडकर यांच्या त्या पुतणी आहेत.  

Website Title: Latest News Accident of sisters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here