Home अहमदनगर डोक्यास बंदूक व पोटाला चाकू लावून दोघांना लुटले

डोक्यास बंदूक व पोटाला चाकू लावून दोघांना लुटले

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात फुंदे टाकळी फाट्याजवळ अज्ञात दोन इसमांनी दोघांना डोक्याला बंदूक तर पोटाला चाकू लावून लुटल्याची घटना मंगळवारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.

फुंदे टाकळी येथील वैष्णव पोपट फुंदे, अंगद बाबासाहेब फुंदे हे आपल्या मोटारसायकलवरून गावातून पाथर्डीकडे जात असताना त्याच्या पाठूमागून काळ्या रंगाची होंडा शाइन मोटारसायकलवर दोन अज्ञात इसम तोंडबांधून आले. पाठीमागून आलेल्या आरोपींनी वैष्णव पोपट फुंदे याच्या डोक्यास बंदूक तर अंगद बाबासाहेब फुंदे याच्या पोटाला चाकू लावला. त्याच्या जवळील पाच हजारांची रक्कम, तर अंगद फुंदे याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन, मोबाईल असा ऐवज चोरून घेऊन गेल्याचा प्रकार भरदिवसा घडल्याने सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. पोलीस प्रशासनापुढे आव्हान निर्माण केले जात आहे.

दरम्यान अज्ञात दोन इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहे.

Website Title: Latest News shot in the head and stabbed in the abdomen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here