Home अहमदनगर संगमनेर: नायब तहसीलदारांवरील गुन्हा मागे घ्यावा अन्यथा कामावर बहिष्कार

संगमनेर: नायब तहसीलदारांवरील गुन्हा मागे घ्यावा अन्यथा कामावर बहिष्कार

संगमनेर(News): संगमनेर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार यांना करोनाची लागण झाली आहे. ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे.या कायद्याचे उल्लंघन करीत संगमनेर ते पुणे असा प्रवास करणाऱ्या संगमनेर तहसील कार्यालयातील नायब तहसील विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायब तहसीलदार यांना करोनाची लागण झाली असल्यामुळे पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. ते व्हेंटीलेटरवर आहेत. नायब तहसीलदार यांनी उल्लेखनीय असे कामे केली आहेत. एक शासकीय अधिकारी कोविड योद्धा म्हणून ते कार्यरत होते. अतिशय गंभीर परिस्थितीत असताना उपचार घेत असताना त्यांच्यावर पोलिसांनी घाईने गुन्हा दाखल करण्याची कारवाई ही असमर्थनीय आहे. करोनाचा प्रादुर्भाव झाल्यास गुन्हा दाखल होत असेल तर कामे कसे करणार असा प्रश्न आहे.

नायब तहसीलदार मृत्यूशी झुंज देत असताना त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अन्याकारक आहे. हा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा सर्व आपत्ती व्यवस्थापानाचे कार्य वगळता इतर कामांवर बहिष्कार टाकतील असा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.  

Website Title: News crime against the Deputy Tehsildar should be withdrawn

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here