Home संगमनेर संगमनेरात करोना कहर सुरूच आज एका रुग्णाची भर एकूण ७२

संगमनेरात करोना कहर सुरूच आज एका रुग्णाची भर एकूण ७२

संगमनेर:  संगमनेर तालुक्यात करोनाचा कहर सुरूच आहे. सततच्या वाढणाऱ्या रुग्णांमुळे संगमनेर प्रशासन व नागरिकांची चिंता वाढलेली आहे.

काल मंगळवारी रात्री उशिरा तीन अहवाल प्राप्त झाले होते. त्यात संगमनेर शहरात लखमीपुरा येथील ३९ वर्षीय तरुण, निमोण येथे ४३ वर्षीय व्यक्ती, मुंबईहून धांदरफळला करोनाचा वानोळा घेऊन आलेला ४८ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. काल दिवसभरात आठ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहरात अजून एका करोना बधीताची भर पडली आहे. शहरातील देवीगल्ली परिसरात एक ५२ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधित संख्या ७२ वर पोहोचली आहे.  तर संगमनेर शहरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात एक रुग्णाची भर पडली आहे. आता या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती गोळा करण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे.

Website Title: Coronavirus News Sangamner patient increased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here