Home अकोले अकोले दिलासादायक: आज ७ जणांना डिस्चार्ज, तालुक्यात एकूण १७ करोनामुक्त

अकोले दिलासादायक: आज ७ जणांना डिस्चार्ज, तालुक्यात एकूण १७ करोनामुक्त

अकोले: अहमदनगर जिल्ह्यात आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात अकोले तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे.

अकोले तालुक्यात एकूण १९ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन जणांवर अहमदनगर बूथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची वाटचाल करोना मुक्त होण्याकडे सुरु आहेत. तालुक्यातील केवळ दोनच व्यक्ती उपचार घेत आहे हे वृत्त अकोलेकरांसाठी दिलासादायक आहे. संगमनेरमधील चार जण करोनामुक्त झाले आहेत.

आज जिल्ह्यात २० जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १६१ जण करोनामुक्त झाले आहेत. अकोले ७, नगर शहर ७, संगमनेर ४, श्रीगोंदा १ ,राहता १ असे २० जण आज बरे होऊन घरी परतले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील वाढता आलेख हा कमी झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची वार्ता आहे.

Website Title: Latest News Akole taluka corona free 7 patient total 17

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here