Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विलगीकरण कक्षातून दाम्पत्य पळाले, गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात विलगीकरण कक्षातून दाम्पत्य पळाले, गुन्हा दाखल

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खळी येथे १० दिवसांपूर्वी करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांचा शोध घेऊन स्थानिक प्रशासनाने गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यातील रुग्णाच्या संपर्कातील दाम्पत्य कोणालाही न सांगता विलगीकरण कक्षातून अवघ्या सहा दिवसांत घरी निघून गेल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खळी येथे दहा दिवसांपूर्वी एका व्यक्तीला त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले होते. यातील एक दाम्पत्य रविवारी ग्राम सुरक्षा समिती व प्रशासनाला कोणतीही माहिती न देता घरी निघून गेले. त्यामुळे या दाम्पत्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खळीच्या ग्रामसेविका वैशाली देवकर यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Website Title: Latest News quarantine couple fled in Sangamner taluka 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here