Home संगमनेर धक्कादायक: संगमनेरात एकाच दिवशी सात रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण ७०

धक्कादायक: संगमनेरात एकाच दिवशी सात रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण ७०

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यात आज मंगळवारी तब्बल सात करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी तीन नंतर दोन आणि आता सायंकाळी आणखी दोन असे सात रुग्ण आढळून आले आहेत. 

संगमनेर शहरातील लखमीपुरा येथे ३९ वर्षीय रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील निमोण येथे ४३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ७० वर पोहोचली आहे. 

वाचा: संगमनेर तालुक्यात आणखी नवे पाच करोना रुग्ण 

आज दिनांक ९ जून मंगळवारी मोमिनपुरा, नायकवाडापुरा, मदिनानगर, लखमीपुरा, निमोण या भागात सात रुग्ण आढळून आले आहेत. 

संगमनेर तालुक्यात वारंवार करोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. या लोकांच्या संपर्कातील व्यक्तींचे शोध घेण्याचे काम सुरु आहे. 

Website Title: News Sangamner taluka Corona seven patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here