Home अकोले अकोले: शेंडीत दुकानाला आग, चार ते पाच लाखांचे नुकसान

अकोले: शेंडीत दुकानाला आग, चार ते पाच लाखांचे नुकसान

शेंडी(News): अकोले तालुक्यातील शेंडी येथे बाजारपेठेतील एका दुकानाला शोर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेंडी बाजारपेठेतील भाऊसाहेब अवसरकर यांच्या छाया जनरल स्टोअर्सला शोर्टसर्किटमुळे आग आग लागून जळून खाक झाले आहे.  सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेंडी येथे भाऊसाहेब अवसरकर यांचे अनेक वर्षापासून छाया जनरल स्टोअर्स आहे. त्यामध्ये शालेय उपयोगी वस्तू, स्टील भांडी रद्दी, फटाकडे विक्रीस असतात. लॉकडाऊनमुळे दुकाने सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत सुरु असतात. त्यानुसार ते एक वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र दुपारी ४ वाजेच्या दरम्यान दुकानांतून अचानक धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली. धुराचे रुपांतर आगीत होऊन दुकानातील माल जळून खाक झाला. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत दुकानातील माल जळून खाक झाला होता. तेथील नागरिकांनी तसेच सरपंच दिलीप भांगरे यांनी अवसरकर यांना धीर देत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मंडल अधिकारी प्रेमानंद पवार यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. महसूल विभागाला देखील पंचनामे करून मदत करण्यास सांगितले आहे.

Website Title: News Akole Shendi Shop fire, loss of lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here