Home संगमनेर संगमनेरात करोनामुळे तीन महिलेंचा मृत्यू, एकूण आठ जणांचा बळी

संगमनेरात करोनामुळे तीन महिलेंचा मृत्यू, एकूण आठ जणांचा बळी

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यात तीन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आज समोर आली आहे. नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी तीनही महिलांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनामुळे झालेल्या मृत्यू संख्या आठ झाली आहे तर जिल्ह्यात ११ झाली आहे.

नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना संगमनेरातील मोमिनपुरा येथील ६५ वर्षीय महिला, नायकवाडापुरा येथील ६३ वर्षीय महिला, आणि शेडगाव येथील ६३ वर्षीय महिलेचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यात तब्बल आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा: संगमनेर तालुक्यात नवे पाच करोनाबाधित 

दरम्यान आज संगमनेर तालुक्यात पाच नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Website Title: News Corona three ladies death Sangamner Taluka 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here