Home अहमदनगर संगमनेरमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह आज पाच तर एकूण ६७

संगमनेरमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह आज पाच तर एकूण ६७

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यात आज आणखी दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. सकाळी संगमनेरचे तीन अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आणखी दोन जणांचा समावेश झाला आहे. त्यामुळे आज दिवसभरात पाच रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेरमध्ये एकूण संख्या ६७ वर पोहोचली आहे.

संगमनेर येथे मुंबईहून आलेला १८ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर संगमनेर शहरातील मोमिनपुरा येथील ३० वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळून आला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण संख्या ६७ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याची एकूण संख्या २२६ वर पोहोचली आहे.

वाचा: संगमनेरात तीन नवे करोनाचे रुग्ण तर दोन बळी

जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे दिसून येत आहे. एकट्या संगमनेरमध्ये ६७ करोनाबाधित आहे. आता या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे. संगमनेरमध्ये करोनाचा कहर हा वाढताना दिसून येत आहे.

Website Title: News Sangamner two Corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here