Home संगमनेर संगमनेरात तीन नवे करोनाचे रुग्ण तर दोन बळी

संगमनेरात तीन नवे करोनाचे रुग्ण तर दोन बळी

संगमनेर(News): संगमनेर तालुक्याची चिंता वाढली आहे. आज नव्याने तीन करोनाबाधित आढळून आले आहे तर दोन महिलांचा बळी करोनाने घेतला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज सहा नवीन रुग्ण आढळून आले आहेत त्यातसंगमनेरमधील तीन जणांचा समावेश आहे. संगमनेर शहरातील मदिनानगर येथील २३ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे. पुना नाका नाईकवाडापुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला आहे. हे दोघही मागील व्यक्तींच्या संपर्कातून बाधित झाले आहे. तर मदिनानगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण झाली आहे. हा व्यक्ती  ड्रायव्हर म्हणून काम करत असून तो बंगळूरू येथून आला होता. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील संख्या ६५ झाली आहे.

दरम्यान मोमिनपुरा येथील ६५ वर्षीय महिला आणि नाईकवाडापुरा येथील ६३ वर्षीय महिलेचा उपचारसुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेरमधील करोना बळींची संख्या सात वर गेली आहे. या घटनेने संगमनेर शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Website Title: News Corona three new patient two death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here