Home Marathi Batmya Today Live संगमनेरातील १३ महिन्याच्या चिमुकली व नगरच्या ७० वर्षीय आजीबाईने केली करोनावर मात

संगमनेरातील १३ महिन्याच्या चिमुकली व नगरच्या ७० वर्षीय आजीबाईने केली करोनावर मात

अहमदनगर: शहरातील माळीवाडा येथील ७० वर्षीय आजीबाईने करोनावर मात केली आहे. तसेच संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एका १३ महिन्याच्या चिमुकलीने करोनावर मात केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात काल १९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यात या दोघींचा समावेश आहे. बूथ रुग्णालयातून यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांनी सदिच्छा दिल्या आहे.

कोल्हेवाडी रोड येथील या चिमुकलीला तिच्या घरच्या कुटुंबाच्या सदस्यांमार्फत करोनाची लागण झाली होती. तिने डॉक्टरांच्या उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि ती या आजारातून बरी झाली आहे.

या ७० वर्षीय आजीबाईंना कुटुंबाच्या संपर्कातून करोनाने गाठले होते. त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने कणखरपणा दाखवत, धैर्य दाखवत या आजाराला सामोरे गेली आणि या आजारावर मात मिळवली आहे.  

Website Title: Latest News 13-month-old Chimukali and 70-year-old grandmother defeated Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here