Home अहमदनगर पतीने केले अल्पवयीन मुलीशी लग्न, संगमनेरच्या या कुटुंबीयांवर गुन्हा

पतीने केले अल्पवयीन मुलीशी लग्न, संगमनेरच्या या कुटुंबीयांवर गुन्हा

नेवासा: आपल्या पतीने केले अल्पवयीन मुलीशी लग्न त्यामुळे पत्नीने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून महादू खंडू खेमनर रा. साकुर जांभळवाडी ता.संगमनेर (पती) याच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.   

संगीता महादू खेमनर वय ३० हल्ली रा. अमळनेर ता. नेवासा (ही सध्या आई, वडील, भाऊ यांच्यासोबत राहते.) हिने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादानुसार तिचा विवाह महादू खंडू खेमनर रा. साकुर जांभळवाडी ता.संगमनेर यांच्याशी २४ मार्च २००८ रोजी अमळनेर येथे झाला.

लग्न झाल्यानंतर दोन वर्ष पतीने व सासरच्यांनी व्यवस्थित नांदाविले. मात्र नंतर सासरच्यांनी तिला किरकोळ कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. पती छोट्या छोट्या कारणावरून मारहाण करीत असे. उपाशीपोटी ठेवायचे. ही माहिती फिर्यादीचे वडील रामदास सोन्याबापू बाचकर यांना दिली. त्यांनी तिला माहेरी घेऊन गेले. तेव्हापासून ती माहेरी वडिलांकडे राहते असे फिर्यादीत म्हंटले आहे.

संगीताचा पती महादू खेमनर याने २६ मे २०२० रोजी खुपटी येथे महादेव मंदिरात दुपारी दोन वाजता एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले. सासरा खंडू बायजी खेमनर, सासू गंगुबाई खंडू खेमनर, रखमा खंडू खेमनर, जालिंदर खंडू खेमनर सर्व रा. साकुर जांभळवाडी ता. संगमनेर तसेच धोंडीबा लक्ष्मण पुणेकर, अल्पवयीन मुलीचे आई, वडील मामा यांनी लग्न लावले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे.

पती महादू खंडू खेमनर रा. साकुर जांभळवाडी ता.संगमनेर याच्यासह नऊ जणांवर बालविवाह प्रतिबंधात कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Website Title: Latest News Sangamner Taluka Husband marries the underage girl  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here