Home संगमनेर संगमनेर तालुक्यात वादातून शेतकऱ्यास बेदम मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात वादातून शेतकऱ्यास बेदम मारहाण, गुन्हा दाखल

संगमनेर(News): संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी या दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी सिद्धार्थ विलास मिसाळ यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपी नितीन रामू मिसाळ व कविता नितीन मिसाळ या दोघानी माझ्या घरात घुसून शौचालय बांधण्याच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच सिद्धार्थ विलास मिसाळ यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. डोक्यात वीट फेकून मारली, पाठीत चाकूचा वार केला यात तो जबर जखमी झाला आहे असे फिर्यादीने सांगितले आहे.

याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे करीत आहे.

Website Title: News Farmer beaten to death over domestic dispute 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here