Home संगमनेर संगमनेरात नगरसेवकाच्या वडिलांना करोनाची लागण

संगमनेरात नगरसेवकाच्या वडिलांना करोनाची लागण

संगमनेर: संगमनेरमध्ये शुक्रवारी सकाळी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यानंतर  आणखी एक रुग्ण आढळून आला.

एक ७३ वर्षीय संगमनेरमधील नगरसेवकाचे वडील बाधित आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संगमनेर करोना बाधितांची संख्या ८१ झाली आहे.

नगरसेवकांच्या वडिलांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ते करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमनेरमध्ये शुक्रवारी तब्बल आठ करोना बाधित आढळून आहे. त्यामुळे संगमनेरकर हादरले आहेत. रुग्णाची संख्या ही वाढतच असल्याने चिंता वाढत चालली आहे.

दरम्यान नगरसेवक व त्यांच्या वडिलांच्या संपर्कात कोणकोणत्या व्यक्ती आल्या आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम स्थानिक प्रशासन करीत आहे.  

Website Title: Corporal’s father infected with coronavirus in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here